पुणे येथे ५ घरे आणि १ दुकान आगीत भस्मसात

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील घोरपडे पेठेतील जोशी वाड्यात १७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. यामध्ये जोशी वाड्यातील ५ घरे आणि १ दुकान जळून खाक झाले. आग आटोक्यात आली असून जीवितहानी झाली नाही.