Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्या २ विमानांमध्ये बाँबची धमकी !
धमकी देणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद
मुंबई – देशांतर्गत २ विमानांमध्ये बाँब ठेवल्याची धमकी विमान आस्थापनाला प्राप्त झाली आहे. दरभंगाहून मुंबईला, तसेच लेहहून देहली येथे जाणार्या विमानांच्या संदर्भात ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी धमकी देणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार धनंजय नारायणराव गावडे (वय ५४ वर्षे) स्पाईस जेटमध्ये ड्युटी मॅनेजर (कर्तव्य व्यवस्थापक) असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत आहेत. त्यांच्या आस्थापनाच्या नावाने कार्यरत असणार्या ‘एक्स’वर या धमकीचा संदेश देण्यात आला होता. या धमकीनंतर विमानांतील प्रवाशांना खाली उतरवून पडताळणी करण्यात आली; पण कोणत्याही प्रकारची स्फोटक किंवा बाँबसदृष्य वस्तू सापडली नाही.
संपादकीय भूमिकाधमकी देणार्यांना कठोरात कठोर शिक्षा केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्या संदर्भात वारंवार अशा धमक्या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! |