कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या संपर्कात आहे ! – Khalistani Terrorist Pannun
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची स्वीकृती
ओटावा (कॅनडा) – ‘सिख फॉर जस्टिस’ या भारताने बंदी घातलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने एका मुलाखतीत मान्य केले की, तो कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या संपर्कात आहे. कॅनडाची वृत्तवाहिनी ‘सीबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत पन्नू म्हणाला की, त्याची संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ गेल्या २-३ वर्षांपासून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या संपर्कात आहे. पन्नू याने ट्रुडो यांना भारतीय उच्चायुक्तालयाच्या गुप्तचर जाळ्याची माहिती दिली होती.
Concerns Over Canadian PM’s Ties to #Khalistani Leader! 🚨
Gurpatwant Singh Pannun, a designated #terrorist by India, claims Canadian PM Trudeau is in contact with him on @CBCNews !
Trudeau’s ties to India’s banned terror groups expose his anti-India bias.
Given Trudeau’s… pic.twitter.com/QPvgOPL2JD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
पन्नू सध्या अमेरिकेत रहातो. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवादी कारवाया करणार्या संघटनेवर भारताने बंदी घातलेली असतांना तिच्या प्रमुखाशी संबंध ठेवणारे कॅनडाचे पंतप्रधान भारतविरोधी आहेत, हे यावरून स्पष्ट होते. आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या ट्रुडो यांच्याकडून भारतावर आरोप झाले नाही, तर नवलच ! |