Bahraich Violence Arrest : बहराइच (उत्तरप्रदेश) येथील दंगलीत हिंदु तरुणाची हत्‍या करणार्‍या ५ मुसलमानांना अटक

चकमकीत २ जण घायाळ

उत्तरप्रदेश पोलीस व अटक करण्यात आलेले घायाळ आरोपी

बहराइच (उत्तरप्रदेश) – येथे १३ ऑक्‍टोबर या दिवशी मुसलमानबहुल भागात श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण करून रामगोपाल मिश्रा या २२ वर्षीय हिंदु तरुणाची हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिंकू उपाख्‍य सरफराज खान आणि तालिब यांना चकमकीनंतर अटक केली आहे. नेपाळ येथे पलायन करत असतांना नेपाळ सीमेवर ही घटना घडली. यात हे दोघेही पायाला गोळ्‍या लागल्‍याने घायाळ झाले आहेत. त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार करण्‍यात येत आहेत. त्‍यांच्‍यासह अन्‍य ३ जणांना अटक केली आहे. यात ज्‍या घरामध्‍ये रामगोपाल याची हत्‍या झाली त्‍या घराचा मालक अब्‍दुल हमीद याचाही समावेश आहे.