कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावादी कारवायांमुळे हिंदु समुदाय घाबरला आहे ! – Canada MP Chandra Arya
कॅनडातील भारतवंशीय हिंदु खासदार चंद्रा आर्य यांचे विधान
ओटावा (कॅनडा) – कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावादी कारवायांमुळे हिंदु समुदाय घाबरला आहे, असे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी म्हटले आहे.
एका व्हिडिओ संदेशात चंद्रा आर्य म्हणाले की,
१. मी अलीकडच्या घडामोडींबद्दल कॅनडातील हिंदूंच्या मनात असलेल्या चिंता ऐकल्या आहेत. एक हिंदु खासदार या नात्याने मीही या चिंता प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. गेल्या आठवड्यात रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या संरक्षणाखाली हिंदु कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जावे लागले; कारण खलिस्तानी निदर्शकांच्या एका गटाने त्याच्या विरोधात हिंसक निदर्शने केली.
Fear Grips Hindu Communities: #Khalistani Separatism on the Rise
Indian-origin Canadian MP Chandra Arya warns of escalating Khalistani separatist activities, sparking fear among Hindus in Canada, India, and worldwide, emphasizing the need for collective action and solidarity.… pic.twitter.com/hPDfYpx9Vp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
२. कॅनडामध्ये आम्ही खलिस्तानी हिंसक आतंकवादाची गंभीर समस्या ओळखली आहे. कॅनडातील एकही राजकारणी किंवा सरकारी अधिकारी यांनी येथील हिंदूंना आश्वस्त केलेले मी ऐकले नाही. बरेच हिंदू अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी चिंतित आणि घाबरले आहेत.
३. आतंकवाद राष्ट्रीय सीमा ओळखत नाही. कॅनडातील खलिस्तानी हिंसक आतंकवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर आमचे सरकार आणि त्याची यंत्रणा आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आतंकवादाचा फटका बसलेल्या देशांना सहकार्य करण्याची अपेक्षा करतो.
४. कॅनडातील हिंदूंना आवाहन करतांना चंद्रा आर्य म्हणाले की, आम्ही या देशातील सर्वांत शिक्षित आणि यशस्वी समुदायांपैकी एक आहोत. येथील हिंदू कॅनडाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत. असे असूनही राजकारणी अनेकदा आमच्या सहिष्णुतेला कमकुवतपणा समजतात. मी तुमच्या वतीने वकिली करण्याची शपथ घेतो; पण माझे एकट्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत. हिंदूंनी आवाज उठवणे आणि सर्व राजकारण्यांना उत्तरदायी धरणे हाच आमच्या समस्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग आहे. आमची सुरक्षा आणि हितसंबंध जपले जातील, याची आम्ही एकत्रितपणे निश्चिती केली पाहिजे.
खलिस्तान्यांना राजकीय संरक्षण
चंद्रा आर्य यांनी कॅनडाच्या ‘द ग्लोब अँड मेल’ वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाचा हवाला दिला. यात कॅनडातील राजकारणी आतंकवादी आक्रमणांचे कौतुक करणार्या कार्यांचे वर्णन केले आहे. या लेखात म्हटले होते की, या देशातील आणि सर्व देशांच्या राजकीय नेत्यांनी इतर देशांतील फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देऊ नये. विशेषतः जे हिंसाचाराचे समर्थन करतात किंवा त्यात सहभागी होतात.
संपादकीय भूमिकाकॅनडातच नाही, तर संपूर्ण जगात हिंदू घाबरलेले आहेत. भारतातही ते जीव मुठीत धरूनच जगत आहेत. हे हिंदूंनाच लज्जास्पद आहे ! |