Badruddin Ajmal On New Parliament : नव्या संसद भवनाची भूमी ‘वक्फ बार्डा’ची !

नवी देहली – ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रटिक फ्रंट’चे अध्यक्ष  बदरुद्दीन अजमल यांनी नवे संसद भवन ‘वक्फ बोर्ड’च्या भूमीवर बांधल्याचा दावा केला आहे. सरकारला वक्फची भूमी बळकावायची आहेे. वक्फची भूमी मुसलमानांना परत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बदरुद्दीन अजमल यांच्या या दाव्यामुळे नवे राजकीय वादळ उठले आहे. (‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशा वृत्तीचे अजमल ! असे आहे, तर मग संसदेचे बांधकाम चालू झाल्याच्या वेळी अजमल यांनी हे का सांगितले नाही ? किंवा त्याविरुद्ध ते न्यायालयात का गेले नाहीत ? सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भविष्यात अशांनी ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्‍चर्य वाटू नये ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !