Vandalising Telangana Temple : झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून निर्माण झालेल्या हिंदुद्वेषातून मंदिरात केली तोडफोड !
तेलंगाणातील मंदिरात तोडफोड करणार्या सलमान सलीम याने दिली स्वीकृती
सिकंदराबाद (तेलंगाणा) – येथील मुथ्यालम्मा मंदिरात तोडफोड केल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या सलमान सलीम याला अटक करण्यात आली आहे. तो मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील रहाणारा असून व्यवसायाने तो संगणक अभियंता आहे. पोलिसांनी केलेल्या त्याच्या चौकशीत त्याने सांगितले की, झाकीर नाईक याच्या व्हिडिआेंमुळे हिंदूंच्या विरोधात त्याच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली होती. त्यातूनच त्याने मंदिरात तोडफोड केली.
Telangana Temple Vandalism: Inspired by Hate Monger Zakir Naik! 🚨
30-year-old engineer, Salman Salim influenced by Zakir Naik’s videos, desecrated Mutyalamma temple, confesses to Hindu hatred.
Such incidents expose the twisted mentality of bigots. But why do other Mu$l!ms… pic.twitter.com/meghUgFivU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 18, 2024
मुंबईतही केली होती मंदिरात तोडफोड
तसेच याआधीही त्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. वसई-विरार (ऑगस्ट २०२४) आणि मुंबई (सप्टेंबर २०२४) येथेही त्याने मंदिरात नासधूस केली होती.
वर्ष २०२२ मध्ये श्रीगणेशोत्सव मंडपात बुट घालून येणे आणि मूर्तीसमोर आक्षेपार्ह वर्तन केल्यावरून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. वसई-विरार येथील भगवान शंकराच्या मंदिरात नासधूस केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. (पूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या घटनांनंतर त्याला अटक होऊनही त्याच्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने पुन्हा अशीच कृती दुसर्या शहरात जाऊन केली. यावरून अशा विद्वेषाने भरलेल्या आरोपींना फाशीचीच शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ती चुकीची ठरू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|