Uttarakhand On Thook Jihad : खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकल्‍यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होणार !  

उत्तराखंडमधील भाजप सरकारचा निर्णय

उत्तराखंडचे आरोग्‍यमंत्री धनसिंह रावत

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तरखंडच्‍या भाजप सरकारने खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकण्‍यासारख्‍या घटनांवर कारवाई करण्‍यासाठी १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्‍याची घोषणा केली. यासमवेतच हॉटेल्‍स आणि ढाबे चालवणार्‍यांची अन् त्‍यामध्‍ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची पोलिसांकडून पडताळणी करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. तसेच स्‍वयंपाकघरात सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवणे आवश्‍यक आहे.

राज्‍य पोलीस आणि आरोग्‍य विभाग यांनी या संदर्भात स्‍वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. उत्तराखंडचे आरोग्‍यमंत्री धनसिंह रावत म्‍हणाले की, सणांच्‍या काळात कोणत्‍याही प्रकारची अस्‍वच्‍छता किंवा समाज विघातक कृत्‍ये खपवून घेतली जाणार नाहीत.

संपादकीय भूमिका

नुसताच दंड नाही, तर कारावासाचीही शिक्षा होणे आवश्‍यक आहे !