मूळ माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद
(रॅपर : पाश्चात्त्य संगीतानुसार गाणारा गायक)
मडगाव – मस्कत, ओमान स्थित मूळ गोव्यातील माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
ब्रागांझावर सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती पसरवण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हिंसात्मक टिपणी केल्याचा आरोप आहे. ब्रागांझा याने ‘एक्स’वर हिंदु संत आणि देवता यांच्यावरही या रॅपच्या माध्यमातून अश्लाघ्य टिपणी केली होती. (आंतरराष्ट्रीय हिंदुविरोधी षड्यंत्र म्हणजेच ‘डीप स्टेट’चाच हा भाग आहे. – संपादक) गोवा पोलिसांनी सामाजिक माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओची गंभीर नोंद घेतली आहे. अनेकांनी या व्हिडिओविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. अवी ब्रागांझा हा मूळ माजोर्डा येथील युवक असून तो विदेशात ‘रॅप’ तसेच ‘पॉप’चे (‘रॅप’ या तमप्रधान संगीताप्रमाणेच ‘पॉप’ हे पाश्चात्त्य तमप्रधान संगीत आहे.) कार्यक्रम करतो. एकूणच जनतेने सामाजिक माध्यमांद्वारे पोलिसांना ‘टॅग’ करत (लक्ष वेधण्याची पद्धत) यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच आधारे पोलिसांनी समाजात तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी संबंधित कलमान्वये ब्रागांझा याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.