काणकोण येथील चावडी बाजारात हिंदूंकडूनही भाजीविक्रीला प्रारंभ
काणकोण, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – चावडी, काणकोण येथील शनिवारच्या बाजारात दसर्याच्या मुहुर्तावर श्री. अजित पै यांनी भाज्या, फळे, फुले यांचे दुकान चालू केले आहे. याद्वारे श्री. अजित पै यांनी एक नवीन पायंडा घालून दिला. या भाजीविक्री दुकानाच्या उद्घाटनाला नगरपालिकेच्या अध्यक्ष सौ. सारा नाईक देसाई, माजी नगराध्यक्ष श्री. रमाकांत नाईक गावकर, हिंदवी स्वराज्य संघटनेचे सर्वश्री दिलखुश शेट देसाई, सम्राट भगत, रमेश देसाई, भाजपचे श्री. सिद्धार्थ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
‘श्री मल्लिकार्जुनदेवाच्या कृपेनेच मला हे दुकान चालू करण्याची संधी मिळाली आहे’, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार श्री. अजित पै यांनी काढले. या वेळी माजी नगराध्यक्ष श्री. रमाकांत नाईक गावकर, श्री. सम्राट भगत, नगराध्यक्षा सौ. सारा देसाई यांनी श्री. अजित पै यांच्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मंगळवार ८ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या हिंदूंच्या एका बैठकीमध्ये भाजी आणि फळे यांचा व्यवसाय करण्यासाठी स्थानिक शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. भाजी आणि फळे यांच्या विक्रीसाठी बागायतदार बाजारामध्ये वेगळा कक्ष ठेवण्याची मागणीही बागायतदार संस्थेच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली होती.
यापूर्वी म्हापसा, शिवोली, कळंगुट, पर्वरी आणि पणची परिसरातील हिंदूंनी विजयादशमीसाठी परराज्यांतील धर्मांधांकडून झेंडूची फुले खरेदी न करण्याचे आवाहन हिंदूंना केले होते. या मोहिमेद्वारे धर्मांधांचा अंदाजे १ कोटी १२ लाख रुपयांचा व्यापार रोखला होता. त्याचप्रमाणे म्हापसा आणि डिचोली येथील हिंदूंनीही काही दिवसांपासून हिंदु व्यापार्यांकडून वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केल्याचे निरीक्षण हिंदुत्वनिष्ठांनी नोंदवले आहे.