गड-दुर्ग आणि शूरवीरांची समाधी यांच्या दुरवस्थेविषयी नितीन शिंदे यांनी माहिती दिली !
छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमितीची बैठक
सांगली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमिती महाराष्ट्राची बैठक मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे अन् भाजपचे आमदार संजय केळकर होते.
या बैठकीमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड-दुर्ग आणि शूरवीरांच्या समाधी यांची दुरवस्था आणि गड-दुर्गांवरील वास्तूंची झालेली पडझड’ या विविध विषयांवर जाहीरनामा मांडण्यात आला. उपसमितीचे सदस्य, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी सूत्रे मांडून सहभाग घेतला. जाहीरनाम्यात घेण्यासंदर्भातील सूचना आणि सूत्रे यांचे लेखी स्वरूपात निवेदन माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांना त्यांनी दिले. या वेळी समितीचे सदस्य राहुल भोसले, राजेश दुगे, रवींद्र सासनकर, भरत आदमापुरे यांनी सूचना आणि सूत्रे मांडली.