भ्रमणभाषवरील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाचे आईवर आक्रमण !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – हातातील भ्रमणभाष काढून घेऊन त्यातील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने आईवर कात्रीने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा रात्री पुष्कळ वेळ मालिका पहात असल्याने आईने मुलाला प्रथम समजावून सांगितले; मात्र मुलाने मालिका पहाणे न थांबवल्याने शेवटी आईने भ्रमणभाष हिसकावून घेतला. तेव्हा मुलगा आक्रमक होऊन त्याने घरातील लाकडी चौकट फोडली, तसेच आईवर कात्रीने वार केले. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरातील खिडकीच्या काचा फोडल्या.

संपादकीय भूमिका

  • मुलांना भ्रमणभाषचा मर्यादित आणि योग्य वापर करण्यासाठी शिस्त लावणे हे पालकांचे कर्तव्य !

  • अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषचे व्यसन किती प्रमाणात लागले आहे, हे यातून लक्षात येते !

  • मुलांसह पालकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते !