Karnataka HC Acquits Pakistani Terror Suspects : आतंकवादाच्या आरोपावरून पाकिस्तानी नागरिकासह तिघांना झालेली जन्मठेपेची शिक्षा कर्नाटक उच्च न्यायालयाकडून रहित !
बेंगळुरू (कर्नाटक) – पाकिस्तानी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आणि आतंकवादी कारवायांचा कट रचल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाकिस्तानी नागरिकासह तिघांची कर्नाटक उच्च न्यायालयाने सुटका केली.
Life sentences of three individuals, including a #Pakistani National, overturned by Karnataka High Court!
👉 Who will monitor these individuals after their release? What if they really engage in #terrorist activities?
👉 It would not be a surprise if such questions arise in the… pic.twitter.com/sxn584BZma
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
बेंगळुरूतील टिप्पू नगरातील सय्यद अब्दुल रहमान, चिंतामणी येथील अप्सरपाशा उपाख्य खुशीउद्दीन आणि पाकिस्तानातील कराचीचा महंमद फहाद उपाख्य महंमद कोया यांनी शिक्षेला आव्हान दिले होते. ‘या तिघांविरुद्ध सादर करण्यात आलेला पुरावा त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्या संघटनेचा भाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही’, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहे तिघेही सुटल्यानंतर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवणार ? त्यांनी खरेच आतंकवादी कारवाया केल्या तर ?, असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ? |