PAK Supports Canada Khalistanis : पाकिस्तान कॅनडात खलिस्तानींना पाठिंबा देत आहे !

कॅनडातील सरकारी यंत्रणेच्या प्रमुखाचे काही दिवसांपूर्वीचे विधान सामाजिक माध्यमांत प्रसारित

ओटावा (कॅनडा) – पाकिस्तान कॅनडातील राजकारणावर प्रभाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. खलिस्तानींना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तान हे पाऊल उचलत आहे, असे विधान कॅनडाच्या ‘सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस’च्या संचालक व्हेनेसा लॉयड यांनी २७ सप्टेंबर या दिवशी केले होते. हे विधान आता सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहे. व्हेनेसा यांचे हे विधान, हे कॅनडाच्या निवडणूक प्रक्रियेत परकीय हस्तक्षेपाच्या अन्वेषणासाठी चालू असलेल्या सुनावणी प्रक्रियेचा एक भाग होते.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुराव्यांविना भारतावर आरोप केल्यानंतर व्हेनेसा यांचे पाकिस्तानच्या संदर्भातील हे वक्तव्य प्रसारित झाले.

संपादकीय भूमिका

याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?