Munawar Faruqui : हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याच्या हत्येचा कट उघड
|
नवी देहली – एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा हिंदुद्वेषी कलाकार मुनव्वर फारूकी याचीही हत्या करण्याचा प्रयत्न लॉरेन्स बिष्णोई टोळी करत असल्याची माहिती समोर आली आहे. फारूकी याला ठार करण्याचा कट इंग्लंडमध्ये रचण्यात आला आहे. लॉरेन्स बिष्णोई गुजरातमधील साबरमती येथील कारागृहात असला, तरी त्याचे काही सहकारी विदेशात राहून टोळी चालवत आहेत. यात गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांचा समावेश आहे. त्यांनीच फारूकी याला ठार करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. रोहित गोदारा याने देहलतील २ मारेकर्यांना फारूकीला मारण्याची सुपारी दिली होती.
Controversial and anti-Hindu comedian Munawar Faruqui on #LawrenceBishnoi Gang’s hit list
The gang allegedly reached out to contract killers from Delhi to execute the comedian
Munawwar Faruqui has often satirized Hindu deities in his shows#SalmanKhanpic.twitter.com/PWNN6bO7gx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2024
१३ सप्टेंबर या दिवशी ग्रेटर कैलाश परिसरात नादिर शाह या एका अफगाणी व्यक्तीची हत्या झाल्याच्या प्रकरणाचा पोलीस अन्वेषण करत असतांना हरियाणातून मारेकर्याला अटक केली. गोदार याने फारूकीला मारण्याची ज्यांना सुपारी दिली होती, त्यांपैकीच हा एक होता. त्याने चौकशीत फारूकीच्या हत्येची सुपारी मिळाल्याचे मान्य केले. नादिर शाह याची हत्या लॉरेन्स बिष्णोई टोळीनेच केली होती.