US On India Canada Row : (म्हणे) ‘कॅनडाचे आरोप गंभीर असल्याने भारताने ते गांभीर्याने घ्यावे आणि अन्वेषणात सहकार्य करावे !’
कॅनडा आणि भारत यांच्यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडामध्ये ठार करण्यात आलेला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे अन्वेषण करण्यासाठी भारताने कॅनडाला सहकार्य करावे, असे अमेरिकेने पुन्हा एकदा सांगितले आहे.
“Since Canada’s allegations are serious, India should take them seriously and co-operate in the investigation!” – USA
America’s Meddling in the India-Canada Dispute!
👉 Who gave the #UnitedStates the right to dictate what India should or shouldn’t do?
👉 Does the US think… pic.twitter.com/PSZEocEZXc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
अमेरिकेच्या सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, भारताने कॅनडाला सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा होती; मात्र कॅनडातील स्वतःच्या दूतावासातील अधिकार्यांना माघारी बोलावून भारताने वेगळा मार्ग चोखाळला असल्याचे दिसत आहे. कॅनडाने केलेले आरोप गंभीर आहेत आणि त्याची गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे. भारत आणि कॅनडा यांचे एकमेकांना सहकार्य करायला हवे होते; पण हा मार्ग अवलंबलेला दिसत नाही.
कॅनडाचे पंतप्रधान, तसेच पोलीस यांनी निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारताचे कॅनडातील उच्चायुक्तालयातील अधिकार्यावर आरोप केला होता. त्यामुळेच भारताने कॅनडाच्या भारतातील दूतावासातील ६ अधिकार्यांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्यावरून अमेरिकेने वरील विधान केले.
संपादकीय भूमिकाभारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ? ‘भारत म्हणजे मध्य-पूर्वेतील इस्लामी राष्ट्र आहे’, असे अमेरिकेला वाटते का ? अमेरिका जगभरात जे काही धंदे करत असते, त्यावर भारताने बोलायला चालू केले, तर अमेरिकेला ते चालेल का ? |