German Ambassador And Nimbu Mirchi : भारतातील जर्मनीच्‍या राजदूतांनी घेतलेल्‍या नव्‍या गाडीला बांधली ‘लिंबू-मिरची’ !

श्रीफळ वाढवून केले वाहनाचे उद़्‍घाटन  

जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन नव्‍या गाडीला ‘लिंबू-मिरची’ बांधताना व श्रीफळ वाढवताना

नवी देहली – जर्मनीचे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी त्‍यांच्‍या कार्यालयासाठी नवीन इलेक्‍ट्रिक चारचाकी गाडी खरेदी केली आहे. अकरमन यांनी या नवीन बी.एम्.डब्‍ल्‍यू. गाडीला दृष्‍ट लागू नये यासाठी गाडीतील आरशाला ‘लिंबू-मिरची’ बांधली. तसेच गाडीसमोर श्रीफळही वाढवला. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाले आहे.

फिलिप अकरमन या प्रसंगी म्‍हणाले की, जर्मनी आणि भारत परस्‍पर भागीदारीसाठी वचनबद्ध आहेत. हिवाळ्‍याच्‍या काळात पर्यावरणाचे प्रदूषण खूप अधिक होते. त्‍यामुळे प्रदूषण अल्‍प करण्‍यासाठी आपण हातभार लावला पाहिजे, असे मला वाटले. मला इलेक्‍ट्रिक गाडी घ्‍यायची होती. याविषयी मी माझ्‍या मुख्‍यालयाशी बोललो होतो. काही दिवसांनी माझी मागणी मान्‍य झाली. ही एक इलेक्‍ट्रिक गाडी आहे, जी अल्‍प प्रदूषण  करते.

संपादकीय भूमिका

विदेशींना जे कळते ते भारतातील ढोंगी पुरो(अधो)गाम्‍यांना कळत नाही, हे लक्षात घ्‍या !