राज्यपालनियुक्त ७ उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ !
मुंबई – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ पैकी ७ उमेदवारांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दिली आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या ३, तर शिवसेना आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पोहरादेवी येथील बाबूसिंग महाराज राठोड यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पंकज भुजबळ आणि इद्रीस नाईकवडी यांचा समावेश आहे. या सर्व नवीन आमदारांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला.