माजी खासदार पूनम महाजन यांची सामाजिक संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक !
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र दौर्यांतर्गत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी खासदार पूनम महाजन यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. या वेळी कोल्हापूर उत्तर-दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत छत्रपती राजाराम चौक येथे बैठक पार पडली. आगामी विधानसभा रणनीती, हिंदुत्व, लोकोपयोगी योजनेचा प्रचार-प्रसार आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे संयोजन ‘करवीर निधी बँके’चे संचालक युवराज शिंदे यांनी केले. या बैठकीला उत्तर-दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते चेतन मोहिते, स्वप्नील पाथरूट, अक्षय वरपे, संजय सातपुते आदी उपस्थित होते.