‘आदि जैन युवक ट्रस्ट’च्या वतीने ‘गो-निवास शेड’चे पुणे येथे लोकार्पण !
पुणे – ‘गोहत्या प्रतिबंधक महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम’ ४ मार्च २०१५ या दिवशी लागू करण्यात आला. त्यामुळे अवैध कत्तल रोखून पोलीस विभागाने पकडलेल्या गोवंशियांची रवानगी गोशाळेत करण्यात येत आहे. यामुळे गोशाळेमध्ये असे गोधन सांभाळण्यासाठी वाढीव पशूआवासाची तातडीने आवश्यकता भासत आहे. त्यानुसार अनुक्रमे मुंबई येथील ‘श्री आदि जैन युवा संघा’च्या प्रेरणेने दानदाते श्रीमती कोकिळाबेन मेहता परिवार (डी. नवीन अँड कंपनी), तसेच श्री. चंदुलाल बोरा आणि श्रीमती मधुबेन बोरा यांच्या आर्थिक सहयोगाने ‘गोमाता आवास’ निर्माण करण्यात आले. ‘आदी जैन युवक चॅरिटेबल’चे संस्थापक श्री. जयेश शहा आणि ट्रस्टी श्री. नवीन गाला, तसेच ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष राज्यमंत्री श्री. शेखर मुंदडा आणि ‘समस्त महाजन संस्थे’चे महाराष्ट्राचे समन्वयक श्री. रमेश ओसवाल यांच्या हस्ते ‘गो-निवास शेड’चे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्रातील अग्रणी गोशाळा संचालक, गोरक्षक श्री. शिवाजीराव गरुड, श्री. सचिन महाराज गुरव, श्री. कैलाश शेलार, श्री. पंडितराव मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरक्षकांचा विशेष सन्मान !
या प्रसंगी हिंदुहृदयसम्राट मा. पंडितराव मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेल्या गोरक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर ट्रस्टच्या वतीने कोयाळी (चाकण) येथील श्री. दिपक निकम यांनी ‘आचार्य श्री विनोबा भावे गोशाळे’स ‘चारा कटर’ भेट दिला.