हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सदगुरु स्वाती खाडये

वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंसमोर आज लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद, मंदिर सरकारीकरण यांसह अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथील ‘तात्यासाहेब कोरे सांस्कृतिक सभागृहा’त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पाटीदार समाजाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव कार्यक्रम ९ दिवस धर्मप्रबोधनासह पारंपरिक पद्धतीने गरबा उत्सव ४० वर्षे साजरा केला जात आहे. यासाठी मलकापूर, बांबवडे, सरूड, कोकरूड, शिराळा, आष्टा, किर्ली, कोतोली येथून धर्मबांधव एकत्र येतात. याचा लाभ ४०० हून अधिक जणांनी घेतला. सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे यांनी साधनेचे महत्त्व सांगितले. या वेळी पाटीदार समाजाचे श्री. सुरेश पटेल (मलकापूर), हरिभाई पटेल (कोडोली), मावजीभाई पटेल (बांबवडे), तुलसीदास पटेल (केर्ले), अरविंद पटेल (कोडोली), हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.