अधिकारी आणि कर्मचारी यांना २९ सहस्र रुपये ‘दिवाळी बोनस’ घोषित !

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय !

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त २९ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस घोषित करण्यात आला आहे. महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.