बाणेर येथील टेकडीवर तरुण-तरुणीला मारहाण करून लुटले !
पुणे – बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेला मित्र आणि त्याच्या मैत्रिणीला चोरट्यांनी मारहाण करून लुटले. त्यांच्याकडून भ्रमणभाष आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. अबिनियू चवांग आणि चिंगमलाई पामेई अशी मारहाण केलेल्यांची नावे आहेत. सायंकाळी हे मित्र-मैत्रीण बाणेर येथील टेकडीवर फिरायला गेल्यावर १८ ते २० वर्षे वयोगटातील ४ जणांच्या टोळीने त्यांना अडवले. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. चिंगमलाई हिच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यांच्याकडील भ्रमणभाष, कानात घालायचे यंत्र (इयर बड), तसेच अन्य साहित्य चोरून ते पसार झाले. घटना घडल्यावर तरुण-तरुणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.
संपादकीय भूमिकाचोरी, मारहाण आणि लुटीच्या घटनांनी उच्चांक गाठला असून चोरट्यांना कायदा अन् पोलीस यांचे भय राहिले नाही, हे चिंताजनक ! |