वाढदिवशी नमन करतो आदिशक्ती ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

दशदिशांतून उदो उदो जयघोष गर्जती ।
साधक दंग होती नामात ऊर्जा मिळे भक्तीची ।। १ ।।

लीन होती चरणांपाशी ऊर्जा मिळे चैतन्याची ।
जगदंबेच्या स्मरणाने प्रत्येक साधकास येई प्रचीती ।। २ ।।

श्री. संकेत भोवर

मातृत्व ममतेने भरलेले ते हृदय ।
सर्वपित्री अमावास्येला झाला तिचा उदय ।। ३ ।।

सर्व साधकांवर आपल्या कृपेचा करी वर्षाव ।
साधकांवरचे दूर होई संकट न राहे दबाव ।। ४ ।।

श्रीविष्णुस्वरूप गुरु लाभले या मातेला ।
श्रेष्ठ भक्ती तिची महत्त्व देई गुर्वाज्ञापालनाला ।। ५ ।।

उत्तराधिकारी म्हणून लाभली या सनातन संस्थेला ।
श्रीसत्‌शक्ति असे आम्हा साधकांची सांभाळी या वैकुंठाला ।। ६ ।।

कधी तारक रूपात कधी मारक रूपात ।
दोन्ही तत्त्व प्रकट होई तिच्या अंतरंगात ।। ७ ।।

अचूक करीत असे साधकांचे ।
निरीक्षण अन् करते दिशादर्शन ।। ८ ।।

सर्वत्र प्रसार करी संस्थेचा ।
जिचे नाव सनातन ।। ९ ।।

माते आमच्या अंतरंगात वाजू दे ।
संबळ तुझ्या नामाचा ।। १० ।।

आशीर्वाद मिळो आम्हा ।
सार्‍या साधकांस साधनेत पुढे जाण्याचा ।। ११ ।।

आज वाढदिवशी ।
नमन करतो तुला आदिशक्ती ।। १२ ।।

आम्हा साधकांच्या अंतर्मनात ।
रुजू दे भक्ती अंतर्मनात रुजू दे भक्ती ।। १३ ।।

– श्री. संकेत भोवर (वय ३० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक