Mandi Masjid Controversy : मंडी (हिमाचल प्रदेश) येथील मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यावर स्थगिती
मंडी (हिमाचल प्रदेश) – येथील मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्याचा १३ सप्टेंबर या दिवशी महापालिका आयुक्तांनी दिलेला आदेश नगररचना विभागाचे प्रधान सचिव देवाश कुमार यांनी स्थगित केला आहे. पालिका आयुक्तांनी मशिदीचे २ मजले पाडण्याचा आदेश दिला होता. प्रकरणातील पुढील सुनावणी २० ऑक्टोबरनंतर प्रधान सचिवांच्या दालनात होणार आहे. मुसलमान पक्षाने आयुक्तांच्या आदेशाला दिलेल्या आव्हानावर ही स्थगिती दिली. गेल्या काही मासांपासून हिंदु संघटना ही मशीद पाडण्यासाठी आंदोलन करत आहेत.
देवेश कुमार यांनी मंडी महापालिकेला कार्यालयीन नोंदींसह बाजू मांडण्यास सांगितले आहे. या नोंदींच्या आधारे मंडी मशिदीविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.