ट्रक आणि हायवा डंपर यांचा अपघात !

इंदापूर (जिल्हा पुणे) – इंदापूर शहरापासून काही अंतरावर इंदापूर-बारामती मार्गावर ट्रक आणि हायवा डंपर यांचा अपघात होऊन दोघे गंभीर घायाळ झाले आहेत. या अपघातात डाळिंब भरून निघालेल्या ट्रकने पेट घेतला. सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र वाहने जळल्यामुळे मोठी हानी झाली आहे.