नारायणाच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी तळमळीने प्रार्थना करणार्‍या रामनाथी (गोवा) आश्रमातील सौ. अनन्या पाटील !

सौ. अनन्या पाटील

‘हे नारायणा, हा जन्म केवळ या देहाने श्वास घेण्यासाठी, या नाशवंत देहाची प्रतिमा उंचवण्यासाठी किंवा त्याचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झाला नसून अंतरात्म्याला श्वास देण्यासाठी झाला आहे’, याची मला सदैव जाणीव असू दे. अंतरात्म्याचा श्वास, म्हणजे हे नारायणा, तुझे स्मरण आहे. तुझे एकदा घेतलेले नाम, म्हणजे एक खरा श्वास घेणे आहे. हे नारायणा, ज्याप्रमाणे देहाचा श्वास बंद झाला, तर त्या क्षणी देह निष्प्राण होतो, तसेच माझ्या आत्म्याचे आहे. तुझ्या नामाचा श्वास घेतला नाही, तर हे भगवंता, मी अनिष्ट शक्ती आणि भवसागर यांमध्ये अनंत काळ बुडून जाईन. हे नारायणा, मला तुझ्या दिव्य स्वरूपाशी एकरूप व्हायचे आहे. ज्याप्रमाणे एक क्षण श्वास घेतला नाही, तर जीव कासावीस होतो, त्याप्रमाणे तुझे नाम घेतले नाही, तर माझा जीव कासावीस होऊन मला तळमळीने तुला आळवता येऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– सौ. अनन्या पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.