बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे शाखेकडे !
पुणे – बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखेकडे अन्वेषण सोपवण्यात आले आहे. याविषयीचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. या प्रकरणात पोलिसांनी ११ ऑक्टोबरला चंद्रकुमार कनोजिया या आरोपीला अटक केली आहे. आरोपी कनोजिया आणि त्याच्या इतर २ साथीदारांविरुद्ध गंभीर चोरीचे गुन्हे नोंद आहेत. इतर दोघा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ते मध्यप्रदेशातून चोरीच्या उद्देशाने पुण्यात आले होते. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीकडून इतर दोघा आरोपींची माहिती घेण्यात येत आहे; परंतु अद्याप काही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.