(म्हणे) ‘भाजप हा आतंकवादी पक्ष !’ – मल्लिकार्जुन खर्गे
मंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला ‘शहरी नक्षलवाद्यांचा पक्ष’ म्हटल्याच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप हा ‘आतंकवादी पक्ष’ असल्याचा आरोप केला. ‘देशभरातील दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांवरील अत्याचारांना भाजप समर्थन देतो’, असे खर्गे यांनी कलबुर्गी येथे बोलतांना म्हटले आहे. (काँग्रेसने ‘आतंकवादी’ या शब्दाची परिभाषाच पालटली आहे. त्याच्या मते राष्ट्राभिमानी म्हणजे ‘आतंकवादी’ आणि राष्ट्रद्रोही किंवा भारताचे तुकडे करण्याची भाषा करणारे हे ‘राष्ट्रप्रेमी’ आहेत. काँग्रेसची ही नीती गांधींना त्यावेळीच लक्षात आली होती आणि म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करावी, अशी शिफारस केली होती ! – संपादक)