हत्येविषयी पोस्ट करणार्या शुभम लोणकरच्या भावाला पुणे येथे अटक !
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रकरण
पुणे – बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर हत्येचे दायित्व लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याची पोस्ट प्रसारित झाली होती. या हत्येची पोस्ट ‘शुभम लोणकर महाराष्ट्र’ या फेसबुक खात्यावरून करण्यात आली होती. या प्रकरणी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण हा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांपैकी एक आहे. त्याने भाऊ शुभमसह या कटात उत्तरप्रदेश येथील धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना सहभागी करून घेतले.