पाश्चात्त्य विकृतीला जवळ केल्याने हिंदूंची दु:स्थिती ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंनी त्यांचा धर्म-संस्कृती विसरून पाश्चात्त्य विकृतीला जवळ केल्याने जगभरात आज भारताची ओळख बलात्कारांचा देश म्हणून झाली आहे. १०० कोटींहून अधिक हिंदू असलेल्या या देशात हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि त्यांच्यासमोर योग्य आदर्श नसल्याने आज ठिकठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्रद्धा वालकरसारख्या कित्येक युवतींचे आज तुकडे होत आहेत, तसेच तिच्या मारेकर्यांना अद्याप शिक्षाही झालेली नाही. या सर्वांवर धर्माचे आचरण आणि साधना करणे हेच उत्तर आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता झाली. याप्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.