बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातील चोरी प्रकरणी ४ जणांना अटक !
|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सातखीरा येथील जेशोरेश्वरी मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर श्यामनगर येथील जेशोरेश्वरी मंदिरातून श्री कालीदेवीच्या मूर्तीचा मुकुट चोरल्याचा आरोप आहे. हा मुकुट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये बांगलादेशाच्या दौर्यावर असतांना दिला होता. हा सोन्याने मढवलेला चांदीचा मुकुट १० ऑक्टोबर या दिवशी चोरीला गेला होता.
या मंदिराचे पुजारी ज्योती प्रकाश चट्टोपाध्याय यांनी मुकुट चोरीला गेल्याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. चोरीची घटना ‘सीसीटीव्ही’तही कैद झाली आहे. या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ जणांची चौकशी चालू आहे; मात्र चोरीला गेलेला मुकुट अद्याप सापडलेला नाही.