कोराडी (नागपूर) येथील श्री महालक्ष्मी मंदिरात पुष्कळ धर्मशिक्षण फलकांद्वारे व्यापक धर्मजागृती !

धर्मजागृतीसाठी जमलेले डावीकडून श्री. शरद वांढे, श्री. देवेंद्र नक्षणे, श्री. दत्तूजी समरीटकर, श्री. अतुल अर्वेनला, श्री. प्रवीण लिखाणकर

नागपूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण फलक लावण्यात आले. हे फलक लावण्यासाठी मंदिराचे एक सदस्य आणि धर्मप्रेमी श्री. शरद वांढे यांनी पुढाकार घेतला अन् धर्मप्रेमी श्री. दिनेश भारती यांनी फलक प्रायोजित केले.

प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्यात आला आहे. प्रतीवर्षी लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. त्यांना धर्मशिक्षण मिळावे. त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने हे फलक लावण्यात आले. श्री. अतुल अर्वेनला यांनी मंदिर विश्वस्तांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे संपूर्ण कार्य सांगितले. मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी सर्व विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी या वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या वेळी श्री. शरद वांढे, मंदिर व्यवस्थापक श्री. प्रवीण लिखाणकर, श्री. रवींद्र काळे, श्री. देवेंद्र नक्षणे, मंदिराचे माजी विश्वस्त श्री. दत्तूजी समरीटकर उपस्थित होते.