Documentary On Hindu-Hater BBC : जागतिक स्तरावर हिंदुद्वेषाचा चेहरा बनलेल्या ‘बीबीसी’ची चिरफाड करणारी ‘डॉक्युमेंट्री’ प्रदर्शित होणार !

‘ग्लोबल हिंदु फाऊंडेशन’ आणि ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून २५ ऑक्टोबरला होणार प्रसारित !

(डॉक्युमेंट्री म्हणजे माहितीपट !)

लंडन (इंग्लंड) : बीबीसी, म्हणजेच ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ ही वृत्तवाहिनी हिंदुद्वेषाने पछाडलेली असून भारत आणि हिंदू यांच्याविषयी खोटी कथानके प्रसृत करण्यासाठी ती कुप्रसिद्ध आहे. अशा बीबीसीच्या विरोधात प्रथमच एक अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ‘डॉक्युमेंट्री’ प्रसारित करण्यात येणार आहे. ‘बीबीसी ऑन ट्रायल’ (बीबीसीच्या विरुद्ध खटला) असे तिचे नाव असून २५ ऑक्टोबरला ती प्रदर्शित केली जाईल, अशी माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख श्री. विनोद कुमार यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. या डॉक्युमेंट्रीचा ‘ट्रेलर’ (छोटे विज्ञापन) १३ ऑक्टोबरच्या रात्री प्रसारित करण्यात आला. ‘ग्लोबल हिंदु फाऊंडेशन’ आणि ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे.

हा विषय सामाजिक माध्यमांवर #BBCOnTrial, #BBCDocumentary, #BBCMukthBharat, #DeportTheBBC, #DefundTheBBC या हॅशटॅग्जने (एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी वापरलेले शब्द) प्रसारित केला जात आहे.

OFFICIAL TRAILER – ‘BBC ON TRIAL’ 

ट्रेलर’द्वारे मांडण्यात आलेली सूत्रे !

१. आरंभी टीना भारद्वाज नावाच्या माजी ‘बीबीसी टीव्ही लायसन्स फी पेयर’ (बीबीसी पहाण्यासाठी कर भरणारी व्यक्ती) म्हणतात की, मी ‘बीबीसी’च्या सातत्यपूर्ण, सदोष आणि कट्टरतावादी वार्तांकनाला कंटाळले आहे. (बीबीसी वृत्तवाहिनी पहाण्यासाठी जनतेला इंग्लंडमध्ये बलपूर्वक कर भरावा लागतो.)

२. या वेळी बीबीसीच्या कार्यालयाबाहेर हिंदू निदर्शने करतांनाचे दिसत आहेत. त्यानंतर बीबीसीचे निवेदक अयोध्येतील राममंदिर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द बोलत आहेत.

३. पुढे ‘बनावट बातम्या बनवणारे जगातील सर्वांत मोठे आस्थापन’ म्हणून बीबीसीला दाखवण्यात आले असून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क, ‘ग्लोबल हिंदु फाऊंडेशन’चे पंडित सतीश शर्मा, तज्ञ रुचिर शर्मा, ब्रिटनमधील लेखक कपिल दुडाकिया, सद्गुरु जग्गी वासुदेव आदी प्रथितयश मंडळींनी वेळोवेळी बीबीसीचा निषेध केल्याचे दाखवण्यात आले आहे.

४. बीबीसीला भारतविरोधी ‘गेट्स फाऊंडेशन’ या संस्थेकडून कोट्यवधी रुपये येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

५. शेवटी ‘स्ट्रिंग रिव्हील्स’चे प्रमुख श्री. विनोद कुमार म्हणतात की, पक्षपात आणि खोटेपणा यांना दुसरे नाव द्यायचे असेल, तर ते ‘बीबीसी’च होय. बीबीसी म्हणजे काही वसाहतवाद्यांचा चमू होय. त्यांना न्यायालयातच ओढले पाहिजे. भारतात त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या आणि भारताची जागतिक स्तरावर नाचक्की करणार्‍या बीबीसीच्या विरुद्ध दंड थोपटणे काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. यासाठी ही ‘डॉक्युमेंट्री’ एक महत्त्वाचे पाऊल असून हिंदूंनी बीबीसीचा भारतातून नायनाट करण्यासाठी आता कटीबद्ध झाले पाहिजे !

हे ही वाचा ➡️ संपादकीय : निर्णायक ‘बीबीसी ट्रायल’ !