संत, गुरु आणि शास्त्र यांचे महत्त्व !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘शिकविल्याविना येत नाही, सांगितल्याखेरीज कळत नाही’, हे केवळ माणसाचेच वैशिष्ट्य आहे. इतर प्राणीवर्गात त्यांची सर्व कामे नैसर्गिक प्रवृत्तीने आणि सहजपणे होतात. माणसाला मात्र स्वतःच्या हिताचे काय आहे ?, ते गुरूंच्या, शास्त्राच्या माध्यमातून जाणून घ्यावे लागते. संत आणि शास्त्रे हे काम वात्सल्याने निरलसपणे करत असतात. गीतेसारखे ग्रंथ आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत हे त्याच वृत्तीचे आहेत. विनोबा गीतेला ‘माऊली’ म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज तर ‘माऊली’ म्हणूनच ओळखले जातात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘जीवनसाधना’)