Bengal Durga Puja Violence : श्यामपूर (बंगाल ) येथे दुर्गापूजेचा मंडप मुसलमानांनी पेटवला !
|
कोलकाता – बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवाच्या वेळी हावडा जिल्ह्यातील श्यामपूर भागात हिंसाचार उसळला. काही धर्मांध मुसलमानांनी दुर्गापूजा मंडप पेटवला, तसेच मूर्तींची तोडफोड केली. काहींनी विसर्जन घाटावर दगडफेकही केली. त्यामुळे दुर्गापूजा उत्सवाच्या वेळी तणाव निर्माण झाला. येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
#DurgaPuja pandal set ablaze by Mu$l!ms in Shyampur (Bengal)
Idols vandalised; Police personnel attacked
Unless and until the President’s rule is imposed in Bengal, there cannot be peace
Until then, Hindus will continue to suffer#HindusUnderAttackpic.twitter.com/iGKi3zGCOB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 15, 2024
या प्रकरणी हावडा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. त्या म्हणाल्या की, आम्हाला काही पूजा मंडपांमध्ये तोडफोड झाल्याच्या तक्रारी लोकांकडून मिळाल्या आणि आम्ही तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठवले. काही लोकांनी पोलिसांवरही आक्रमण केले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला हिंसाचाराचा निषेध !
बंगालमधील भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेली दगडफेक आणि मूर्तींची तोडफोड प्रकरणी बंगालच्या गृहसचिवांना त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी केली.
Today a group of miscreants while returning from the Shyampur Police Station where they went to submit a deputation, went berserk and started vandalising the Durga Puja Pandals.
They set on fire the idols at the Shyampur Bazar Byabsayi Samiti Puja Pandal and vandalised other… pic.twitter.com/FETp5rsSJd— Suvendu Adhikari (@SuvenduWB) October 13, 2024
भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंगाल सरकारवर टीका करतांना ‘धर्मांधांनी दुर्गापूजा मंडप आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांना लक्ष्य केले आणि गदारोळ केला. हा प्रकार सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अपमान करणारा आहे’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|