बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – बदलापूरच्या आरोपीने पोलिसांवर गोळ्या चालवल्या, त्याचे प्रत्युत्तर पोलिसांनी दिले. तेव्हा विरोधक विचारू लागले, ‘पोलिसांनी आरोपीवर गोळ्या का झाडल्या ?’ मग काय पोलिसांनी गोळ्या खायच्या का ? राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना फासावर लटकवू, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात ५ नावे समोर आली आहेत. शिवकुमार गौतम, महंमद झिशान अख्तर, शुभम लोणकर, गुरमेर सिंग आणि धर्मराज अश्यप अशी त्यांची नावे आहेत. पाच आरोपींची नावे आहेत. सध्या शिवकुमार गौतम, महंमद झिशान अख्तर, शुभम लोणकर यांचा पोलिसांकडून शोध चालू आहे. शुभम लोणकर याने फेसबूक पोस्टद्वारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे.