Canada-based Khalistani : कॅनडाने त्याच्या भूमीवर कार्यरत खलिस्तानी आतकंवाद्यांना भारताकडे सोपवावे ! – भारत

नवी देहली – कॅनडाने भारताच्या विरोधात निरुपयोगी विधाने करण्याऐवजी भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे सुपुर्द करण्यासमवेत भारतविरोधी खलिस्तान्यांवर आळा घालावा, असे भारताने कॅनडाला सुनावले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे वक्तव्य आणि अन्वेषण यंत्रणेचे आरोप या दोन भिन्न गोष्टी असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने म्हटले आहे की, कॅनडाने त्याच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताकडे सोपवले पाहिजे. भारताने नुकतेच उच्च सुरक्षा अधिकारी आणि ट्रुडो सरकारचे राजदूत यांना भारताच्या भूमिकेविषयी पूर्णपणे माहिती दिली.

१. भारताने कॅनडाला नियम आणि आंतरराष्ट्रीय कायदे यांची माहिती देऊन स्पष्ट केले की, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कोणताही पुरावा सादर केल्याविना आतंकवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येसाठी भारतावर बिनबुडाचे आरोप करू शकत नाहीत किंवा ते तथाकथित ‘गुन्हेगारां’ना दोष देऊ शकत नाहीत.

२. खलिस्तानी आतंकवाद्याच्या हत्येचा तपास करणार्‍या भारतीय अन्वेषण अधिकार्‍यांना कॅनडाकडून सातत्याने देण्यात येत असलेल्या राजकीय मार्गदर्शनावर भारताने चिंता व्यक्त केली आहे आणि त्याला चुकीचे म्हटले आहे.

३. १८ जून २०२३ या दिवशी निज्जर याच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहिले आहेत.

४. ११ ऑक्टोबर २०२४ या दिवशी ‘आसियान परिषदे’च्या पार्श्‍वभूमीवर भोजनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जस्टिन ट्रुडो  समोरासमोर आले होते; मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भारताने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

इस्रायल आणि अमेरिका ज्याप्रकारे त्यांच्या शत्रूंना दुसर्‍या देशात घुसून ठार मारतात, त्याप्रकारे आता भारताने कॅनडाला असे आवाहन करण्यापेक्षा कॅनडात घुसून तेथील खलिस्तान्यांना ठार मारावे, असेच राष्ट्रप्रेमी भारतियांना वाटते !