Gauri Lankesh Murder Case : गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी ८ जणांना जामीन मंजूर
बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित असणार्या ८ जणांना ९ ऑक्टोबर या दिवशी बेंगळुरू सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या ८ जणांमध्ये परशुराम वाघमोरे, मनोहर येडवे, राजेश बंगेरा, अमोल काळे, वासुदेव सुर्यवंशी, हृषिकेश देवडीकर, गणेश मिस्कीन आणि अमित रामचंद्र बद्दी यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील संशयित भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकर, सुजित कुमार आणि श्रीकांत पांगरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला होता. संशयितांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता अरुण श्याम, अधिवक्ता अमर कोर्रीया, अधिवक्त्या दिव्या बाळेहित्तलु आणि अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली होती.