Bahraich Violence : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे श्रीदुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानांचे आक्रमण !
|
बहराइच (उत्तरप्रदेश) – येथील रेहूमा मन्सूर या मुसलमानबहुल गावातील महाराजगंग या भागातून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणूक जात असतांना डिजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावण्यावरून झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांनी मिरवणुकीवर दगडफेक करत आक्रमण केले. याला हिंदूंकडूनही प्रत्युत्तर देण्यात आल्यावर मुसलमानांनी राम गोपाल मिश्रा (वय २२ वर्षे) याची गोळ्या झाडून, तसेच धारदार शस्त्रांचे वार करून निर्घृण हत्या केली. यामुळे हिंदू अधिक संतप्त झाले आणि त्यांनी येथील घरे आणि दुकाने यांना आग लावली. पोलिसांनी महंमद फहीम, महंमद नानकाऊ, महंमद सरफराज, महंमद साहिर खान, महंमद मारूफ अली, महंमद अब्दुल हमीद यांच्यासहित २५ जणांना अटक केली आहे. सध्या महाराजगंज येथे अघोषित संचारबंदी आहे. तसेच इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
#BahraichViolence : Mu$|!ms Attack on Shri Durga Devi Idol Immersion Procession in Bahraich (Uttar Pradesh)!
– Brutal Murder of a Hindu #GopalMishra
– Angry Hindus set fire to Mu$|!m homes and shops
– “Won’t perform last rites until action is taken against the accused!” –… pic.twitter.com/2G43j6KIpp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 14, 2024
नेमके काय घडले ?मिवरवणूक मुसलमानबहुल भागातून जाऊ लागल्यावर डिजे लावण्यावरून वाद झाला. अब्दुल हमीद त्याची मुले साबलू, सरफराज आणि फहीम यांच्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी शिवीगाळ चालू केली. या वेळी अन्य मुसलमानांनी घरांच्या छतावरून दगडफेक केली. ज्यात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचा हात तुटला. त्यानंतर लोकांनी विसर्जन मिरवणूक थांबवून विरोध चालू केला. हिंदूंनी दगडफेकीला प्रत्युत्तर दिले आणि त्यातील राम गोपाल मिश्रा हा अब्दुल हमीद याच्या घराच्या छतावर चढला आणि तेथील हिरवा ध्वज काढून टाकला अन् तेथे भगवा ध्वज लावला. यानंतर धर्मांध मुसलमानांनी त्याला खेचून घरात नेले आणि त्याची नखे खेचून काढली. त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या, तसेच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. राम गोपाल याला वाचवण्यासाठी आलेला राजन हा तरुणही गंभीररित्या घायाळ झाला. राजन याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या हिंसाचारात १२ जण घायाळ झाले आहेत. राम गोपाल मिश्रा याचे ३ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने येथील मुसलमानांची घरे आणि दुकाने यांना आग लावली. दुचाकीच्या एका मोठ्या दुकानालाही (‘शो रूम’लाही) आग लावण्यात आली. तसेच एका रुग्णालयालाही आग लावलण्यात आली. पोलिसांच्या काही गाड्याही जाळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. |
आरोपींवर कारवाई करेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही ! – हिंदूंची चेतावणी
‘राम गोपाल मिश्रा याची हत्या करणार्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत’, असे हिंदूंकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर आंदोलन चालू केले आहे. राम गोपाल मिश्रा यांच्या आईने ‘हत्येचा सूड हत्येनेच घेतला पाहिजे’ असे म्हटले, तर त्याच्या बहिणीने ‘जोपर्यंत आरोपींना फाशी देऊन दफन केले जात नाही, तोपर्यंत भावाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही’ असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
शवविच्छेदन केले असता राम गोपाल याला गोळी मारण्यासह चाकूने भोसकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. १४ ऑक्टोबरला सकाळी मृतदेह घरी पोचल्यावर ५- ६ सहस्र हिंदूंचा जमाव जमला. मृतदेह घेऊन लोकांनी सुमारे ५ कि.मी. अंत्ययात्रा काढली. या वेळी काही ठिकाणी जमावाने जाळपोळ चालू केली. अनेक ठिकाणी संतप्त हिंदूंनी अनेक घरांना आग लावली. महसी तहसीलच्या मुख्य बाजारपेठेत आग लावली. पोलीस त्यांना नियंत्रणात आणण्यात हतबल दिसून आले.
मूकदर्शक पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे ! – मृत राम गोपालचा भाऊ वैभव याची मागणी
मृत राम गोपाल याचा भाऊ वैभव मिश्रा म्हणाला की, आम्ही मूर्ती घेऊन जात होतो. या वेळी अब्दुल हमीद याच्या घरातून अचानक दगडफेक चालू झाली. पोलीस येथे उपस्थित असतांना त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आमचा मोठा भाऊ पुढे आला आणि दगडफेक करणार्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हिंदूंनाच मागे ढकलले. पोलिसांनी आमच्यावर लाठीमार केला. पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
|
पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर लोक संतप्त झाले ! – पोलीस अधीक्षकांचा दावा
पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला म्हणाल्या की, विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला पूजा समितीच्या लोकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांनी लाठीमार केला. (दगडफेक करणार्यांवर लाठीमार करण्याऐवजी हिंदूंवरच लाठीमार केल्यावर हिंदूंनी विरोध केला, तर ते चुकीचे कसे ? या लाठीमाराची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे तणाव आणखी वाढला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या २५ जणांना कह्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. लोकांची समजूत काढल्यानंतर अधिकार्यांनी मूर्तींचे विसर्जन चालू केले.
या हिंसाचारामुळे परिसरातील सुमारे १ सहस्र १०० मूर्तींचे विसर्जन थांबवण्यात आले होते. आरोपींना अटक केल्यानंतर लोकांनी मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रारंभ केला.
हिंसाचार करणार्यांना सोडणार नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
या घटनेची गंभीर नोंद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून हिंसाचार करणार्यांना सोडले जाणार नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर या घटनेसाठी ज्यांचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा उत्तरदायी ठरला, अशा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
जनपद बहराइच के महसी में माहौल बिगाड़ने वालों को बख्शा नहीं जाएगा।
सभी को सुरक्षा की गारंटी, लेकिन उपद्रवियों और जिनकी लापरवाही से घटना घटी है, ऐसे लोगों को चिह्नित कर कठोरतम कार्रवाई के निर्देश दिए हैं।
प्रतिमा विसर्जन जारी रहेगा। प्रशासन और पुलिस के अधिकारियों को मौके पर…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 13, 2024
२ पोलीस अधिकारी निलंबित
या प्रकरणात निष्काळजीपणा करणार्या २ पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|