सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी, ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवमोग्गा (कर्नाटक) येथील चि. पावन गुरुमूर्ती गौडा (वय ५ वर्षे) !
‘अश्विन शुक्ल द्वादशी (१४.१०.२०२४) या दिवशी शिवमोग्गा (कर्नाटक) येथील चि. पावन गुरुमूर्ती गौडा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. पावन गुरुमूर्ती गौडा हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
१. चि. पावनच्या जन्मापूर्वी
अ. ‘गर्भारपणी मी पुष्कळ सेवा करत होते.
आ. त्या कालावधीत ‘सात्त्विक आहार घ्यावा’, असे मला वाटत असे.
इ. त्या काळात माझी संतांशी भेट झाली होती आणि त्यांचे मला मार्गदर्शन लाभले होते.
ई. मला ‘ग्रंथ वाचावे आणि नामजप करावा’, असे वाटायचे. त्या वेळी मी ‘ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ॐ ॐ ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायचे.
उ. रुग्णालयातील वातावरण आनंददायी होते. माझी साधक बहीण भव्या गौडा हिने रुग्णालयात भ्रमणभाषवर भक्तीसत्संग लावला होता. आम्ही तो ऐकत होताे.
ऊ. माझ्या बहिणीला ‘आमच्या घरी देवी येणार आहे. मला मुलगी होणार’, असे स्वप्न पडले होते. ही जणू तिला स्वप्नात मिळालेली पूर्वसूचनाच होती.
२. जन्मानंतर
अ. बाळाला पहातांना ‘मी देवीलाच पहात आहे’, असे मला वाटले.
आ. बाळाला बघायला येणार्या साधकांनाही तिच्याकडे पाहून शांतता जाणवत होती. ‘हिला पाहून माझे आज्ञाचक्र जागृत होत आहे’, असे एक साधक म्हणाले.
३. जन्म ते १ वर्ष
३ अ. सात्त्विकतेची आवड
१. पावन एक वर्षाची असतांना ‘छायाचित्रमय जीवनदर्शन (खंड ३)’ (‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य ’) या ग्रंथात असलेले सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांचे छायाचित्र बरोबर ओळखून ते आम्हाला दाखवायची.
४. १ ते २ वर्षे
अ. पावन लवकर बोलायला शिकली.
आ. ती २ वर्षांची असतांना श्लोक म्हणत असे. तिला आरती करायला पुष्कळ आवडते. त्यातही तिला ‘ज्योत से ज्योत जगाओ …’ ही सद्गुरूंची आरती पुष्कळ आवडते.
५. ३ ते ४ वर्षे
५ अ. साधकांविषयी प्रेम वाटणे
१. एकदा मी सेवेला गेले होते. तेव्हा माझी सेवा होईपर्यंत ती सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत एका साधकांच्या घरी आनंदाने राहिली होती.
२. साधकांना पहाताच ‘हे आपले आहेत’, असे तिला वाटते.
३. तिला साधकांच्या घरी गेल्यावर आनंद वाटतो.
५ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत आणि देव यांच्याप्रती असलेला भाव
१. ती पू. अण्णा यांच्या (साधकांसाठी घेतलेल्या) सत्संगात बसून त्यांचे मार्गदर्शन समजून घेते. तिला ते फार आवडते. एकदा पू. अण्णांनी सत्संग घेतला नाही. तेव्हा ‘ती पू. अण्णा केव्हा येणार ? ते सत्संग केव्हा घेणार ?’, असे मला विचारत होती.
२. पावन सकाळी आणि संध्याकाळी झोपतांना छायाचित्रमय जिवंदर्शन : खंड ३ हा ग्रंथ बघून झोपते. तिला राम आणि कृष्ण यांची वेशभूषा केलेली गुरुदेवांची छायाचित्रे पहायला फार आवडतात. ती पुष्कळ वेळ ती पुस्तिका पहाण्यात गर्क असते.
३. ती रात्री झोपतांना ‘देवाचीच गोष्ट सांग’, असे मला म्हणते. ती मला ‘राम, कृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या कथा सांग’, असे म्हणते आणि ती कथा ऐकत झोपते.
५ इ. शेजार्यांना नामजपाचे महत्त्व सांगणे : एकदा ती आमच्या शेजार्यांच्या घरी गेली होती. तेव्हा तिला ते काही कारणाने रडत असल्याचे दिसले. त्या वेळी ती त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही असे रडू नका. नामजप करा. कृष्णाचा नामजप कसा करायचा ? ते माझ्या आईला विचारा. ती तुम्हाला सांगेल.’’ नंतर शेजार्यांनी मला बोलावले आणि ‘पावन त्यांना काय म्हणाली ?’ ते सांगून ‘काय करायचे ?’, हे मला विचारले.
गुरुकृपेने पावनविषयी इतक्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. असे बाळ मला दिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. रमानंद अण्णा यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. दिव्या गौडा (चि. पावनची आई), शिवमोग्गा, कर्नाटक. (२३.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |