मंचर लोंढेमळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला उत्साहात आरंभ !

मार्गदर्शन करतांना साहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रकाश लोंढे

मंचर (जिल्हा पुणे), १३ ऑक्टोबर (वार्ता.) – मंचर (लोंढेमळा) येथे नुकताच महिलांसाठी नव्याने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वेळी स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या. प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा साहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रकाश लोंढे, ‘भाजप किसान मोर्चा’चे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संजय थोरात, प्रखर धर्माभिमानी श्री. तुकाराम लोंढे आणि श्री. अरुण लोंढे यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. प्रशिक्षणवर्गाचा प्रारंभ भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. या वेळी श्री. प्रकाश लोंढे यांनी सर्वधर्मसमभावाची निरर्थकता स्पष्ट केली.

प्रशिक्षणवर्गात सहभागी झालेल्या युवती

श्री. संजय थोरात यांनी महिलांची सद्य:स्थिती सर्वांसमोर मांडली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय चौधरी यांनी प्रशिक्षणवर्गाची आवश्यकता उपस्थितांना स्पष्ट केली. या वेळी ‘शिबिराच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात आले’, असे उपस्थित युवतींनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण

काही पुरुष आपल्या पत्नीलाही वर्गाला घेऊन आले होते. प्रशिक्षणवर्गाला सर्व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.