हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे सामूहिक शस्त्रपूजन पार पडले !’
‘हर हर महादेव’च्या गर्जनेत धर्मप्रेमींचा उपक्रमात पुढाकार घेऊन उत्साहात सहभाग !
पुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – दसर्याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने पुणे येथे ठिकठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन पार पडले. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना आणि प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमात बहुसंख्येने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बर्याच ठिकाणी धर्मप्रेमींनी तळमळीने संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले होते.
१. श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान मंदिर, वीर – श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान मंदिर विश्वस्त आणि पुरोहित यांनी या शस्त्रपूजनाचे नियोजन केले. या वेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात शस्त्रपूजन केले आणि ‘हर हर महादेव’ची गर्जना केली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
२. श्री सालू मालू मंदिर, पारगाव (सा.मा.), दौंड – येथे पारगाव शाखेतील गणेश ताकवणे, सार्थक ताकवणे आणि अन्य धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन उपक्रमाचे नियोजन करून उपक्रम घेतला. या उपक्रमाला महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३. आळंदेवाडी येथे रणरागिणी शाखेतील महिला, अन्य धर्मप्रेमी युवक-युवती यांनी एकत्रित येऊन शस्त्रपूजन मांडणी आणि प्रसार केला. आढेगाव, राधाकृष्ण मंदिर, हडपसर, वाघळवाडी येथेही धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन उपक्रमाचे नियोजन केले.