कल्याण येथे इस्लामचे उदात्तीकरण करणारा फलक हटवला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम

कल्याण – येथील बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सार्वजनिक विद्युत् खांबावर अन्य धर्मांना न्यून लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणारा एक फलक लावण्यात आला होता. ११ ऑक्टोबर या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ १ वर यासंदर्भात ‘कल्याण येथे अन्य धर्मांना न्यून लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणारा फलक !’, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताचा परिणाम म्हणून १३ ऑक्टोबरला तो फलक नसल्याचे आढळून आले.