हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी : अजमेर याला अटक

अटक केलेला आरोपी (डावीकडे)आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी

चंडीगड – हरियाणाचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या अजमेर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ८ ऑक्टोबरला मतमोजणीच्या दिवशी त्याने ही धमकी दिली होती.