नवनीत राणा यांना धमकीचे पत्र !
मुंबई – भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. आमिर या नावाचा पत्रात उल्लेख आहे. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोर गाय कापण्याची धमकीही त्याने या पत्रात दिली आहे. एवढेच नव्हे, तर १० कोटी रुपये खंडणीही या पत्रात मागितली आहे आणि ‘ती दिल्यास पाठ सोडू’ अशी धमकीही दिली आहे.
या पत्रात नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. पत्र पाठवणार्याने स्वत: हैदराबादचा असल्याचे म्हटले आहे. त्यांना आलेल्या एका भ्रमणभाष क्रमांकाचा उल्लेख करून तो दुबईहून आल्याचेही त्याने म्हटले आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असेही या पत्रात लिहिले आहे. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.