नाशिक जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची नवरात्रोत्सव मोहीम साजरी !

नाशिक – हिंदु भगिनींमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती करणे आणि आपली संस्कृती वाचवणे, यासाठी काळानुसार दुर्गादेवीची कृपा प्राप्त करण्याचे साधन आहे, यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विषयावर जनजागृती मोहीम, तसेच ‘आदर्श नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात निवेदने देण्यात आली.

धर्मजागृतीपर व्याख्याने घेण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. सर्वच ठिकाणी महिलांचा पुष्कळ उत्साह होता. या वेळी सर्वांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली.