मोरोक्‍कोतील सहारा वाळवंटात सलग २ दिवस पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे तलाव भरले !

हवामान पालटाचा परिणाम !

सहारा वाळवंट

रबात (मोरक्‍को) – जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्‍या जाणार्‍या आफ्रिकेच्‍या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्‍याने भरले. तज्ञांच्‍या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. याआधी वर्ष १९७४ मध्‍ये ६ वर्षांच्‍या दुष्‍काळानंतर सहारा वाळवंटात पाऊस पडल्‍याने पूर आला होता.

२४ घंट्यांत १०० मिमी पाऊस !

दक्षिण-पूर्व मोरोक्‍कोमध्‍ये वर्षभर सरासरी २५० मि.मी.पेक्षा अल्‍प पाऊस पडतो; मात्र सप्‍टेंबरमध्‍येच सलग २ दिवसांत अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.  राजधानी रबातपासून सुमारे ४५० कि.मी. दक्षिणेला असलेल्‍या टॅगौनित गावात २४ घंट्यांत  १०० मि.मी. पाऊस पडला आहे.

संपादकीय भूमिका 

हवामान पालटाचा हा चांगला परिणाम म्‍हणायचा कि वाईट ?