Gonda UP Stone Pelting : श्री दुर्गादेवीच्‍या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

गोंडा (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील घटना

गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील नगर कोतवाली पोलीस ठाण्‍याच्‍या घोसियाना या मुसलमानबहुल भागातधर्मांध मुसलमानांनी श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी अतिरिक्‍त पोलीस फौजफाटा मागवला आणि नंतर मिरवणूक पुढे नेण्‍यात आली.

१२ ऑक्‍टोबरला सायंकाळी ७ वाजण्‍याच्‍या सुमारास विसर्जन मिरवणूक खैरा मंदिर तलावाकडे जात होती. या वेळी २-३ मजली असणार्‍या घरांवरून झालेल्‍या दगडफेकीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (ही घरे अधिकृत आहेत का ?, याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे. जर ती अनधिकृत असतील, तर त्‍यांवर कारवाई करायला हवी ! – संपादक) या ठिकाणी प्रसिद्ध तकिया मशीदही आहे. (हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर जेथे मशिदी असतात, तेथेच सर्वाधिक आक्रमणे होतात, हे लक्षात घ्‍या ! – संपादक) दगडफेकीनंतर हिंदूंकडून घोषणाबाजी करत येथेच धरणे आंदोलन चालू करण्‍यात आले. पोलिसांनी अधिक पोलीस मागवल्‍यानंतर आणि आरोपींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्‍यावर मिरवणूक पुन्‍हा मार्गस्‍थ झाली.

संपादकीय भूमिका

  • काश्‍मीरमधील धर्मांध मुसलमानांकडून होणारी दगडफेक थांबवण्‍यात यश आले असतांना देशात हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे का थांबवली जाऊ शकत नाहीत ?, याचे उत्तर सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंना दिले पाहिजे !
  • उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ही स्‍थिती आहे, तर देशातील अन्‍य राज्‍यांत कशी स्‍थिती असेल ?