Muslim Threatened Traffic Police : मुसलमानाकडून वाहतूक पोलिसाला ठार मारण्याची धमकी
विनापरवाना आणि शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवतांना पकडले !
संभल (उत्तरप्रदेश) – विनापरवाना आणि शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवणार्या रहिश अहमद नावाच्या वृद्ध मुसलमानाला देवेंद्र कुमार या वाहतूक पोलिसाने पकडल्यावर त्याने पोलिसाला ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी रहिश याला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. ही घटना ८ ऑक्टोबरला घडली.
पोलीस हवालदार देवेंद्र कुमार यांनी रहिश याला दुचाकीवरून जात असतांना थांबवल्यावर रहिशने देवेंद्र कुमार यांच्या पोटाकडे बोट दाखवत ‘पुढच्या वेळी मी तुला थांबवेन, तेव्हा तुझ्यावर पोटावर वार करीन’, अशी धमकी दिली. देवेंद्र कुमार समवेत असणार्या दुसर्या पोलिसाने घटनेचे चित्रीकरण करण्यास चालू केल्यावर रहिश याने पोलिसांवर लाचखोरीचा आरोप केला.
संपादकीय भूमिका
|